Advertisement

नवी मुंबई पालिकेच्या शाळा सोमवारपासून ऑनलाईन

नवी मुंबई महापालिका शाळांमधील अभ्यासक्रम 15 जूनपासून ऑनलाईन सुरू करण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थी, पालकांना मोठय़ा प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.

नवी मुंबई पालिकेच्या शाळा सोमवारपासून ऑनलाईन
SHARES

नवी मुंबई महापालिका शाळांमधील अभ्यासक्रम 15 जूनपासून ऑनलाईन सुरू करण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थी, पालकांना मोठय़ा प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. 

नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग दक्ष असून आधुनिक ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा प्रभावी वापर केला जाणार आहे.

सीबीएसई अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र एप्रिलपासून सुरू होत असल्याने 1 एप्रिलपासूनच नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसईच्या दोन्ही शाळांमधील अभ्यासक्रम ऑनलाईन सुरु करण्यात आले आहेत. आता  15 जूनपासून सर्वच शाळांतील अभ्यासक्रम ऑनलाईन शिकविले जाणार आहेत. ऑनलाईन पध्दतीने शिकविण्याकरिता ई-लर्निंग साहित्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्याच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे.


याकरिता विविध संकेतस्थळे, पोर्टल यांच्या सहाय्याने निरनिराळ्या विषयांचे अध्यापन करणारे शिक्षक इयत्तानिहाय व विषयनिहाय घटकांचे सूक्ष्म नियोजन करुन ई-लर्निंग साहित्य तयार करीत आहेत. यामध्ये ऑडीओ, व्हिडिओ, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असे विविध प्रकारचे पूरक साहित्य तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या ऑनलाईन शिक्षण पध्दतीच्या अनुषंगाने स्वतंत्र यू-टयुब चॅनल तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत.

तत्पूर्वी विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकांच्या वितरणाचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले असून प्रत्येक शाळेमध्ये पालकांना आपल्या पाल्याची पाठय़पुस्तके वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. याशिवाय शासनाने इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतची पुस्तके http://cart.ebalbharti.in/BalBooks/ebooks.aspx  या लिंकवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन दिलेली आहेत. 



हेही वाचा -

दिव्यांगासाठी राज्यातील पहिले कोविड रूग्णालय नवी मुंबईत

वाशीमध्ये विशेष कोविड रुग्णालय सुरू, 'इतक्या' खाटांची असेल व्यवस्था




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा