Advertisement

मिठीबाई काॅलेजबाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन, पोलिसांनी केली धरपकड


मिठीबाई काॅलेजबाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन, पोलिसांनी केली धरपकड
SHARES

विलेपार्लेतील श्री विलेपार्ले केळवाणी मंडळाच्या मिठीबाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. असं असतानाही त्यांना अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करत प्रहार विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे काॅलेजसमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी हांडे यांना ताबडतोब प्राचार्यपदावरुन हटवण्याची तसंच त्यांना अटक करण्याची मागणी केली.  

प्रहार विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते मिठीबाई काॅलेजसमोर मंगळवारी दुपारी जमले. या विद्यार्थ्यांनी ‘बोंब मारो’ आंदोलन करत प्राचार्य डाॅ. हांडे यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांची गडबड वाढत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी या दोन संघटनांतील ४० कार्यकर्ते आणि १० महिलांना ताब्यात घेत काही वेळाने सोडून दिलं.

यामध्ये प्रहार विद्यार्थी संघटना अध्यक्ष मनोज टेकाडे सरचिटणीस अजय तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना अध्यक्ष अमोल मातेले यांचा समावेश होता. याआधी या संघटनांनी महिला आयोगाच्या सचिव मंजुषा मोळवणे यांची भेट घेऊन त्यांना प्राचार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचं पत्र दिलं. 



हेही वाचा-

अकरावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आवडत्या काॅलेजांमध्ये प्रवेश, सरकारने घेतला जागावाढीचा निर्णय

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला डमी उमेदवार, दोघांना अटक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा