Advertisement

खासगी क्‍लासेस चालकांवर आर्थिक संकट कायम

राज्यातील लहान आणि मध्यम कोचिंग क्‍लासेस मागील साडे सहा महिन्यांपासून बंद आहेत.

खासगी क्‍लासेस चालकांवर आर्थिक संकट कायम
SHARES

कोरोनामुळं (corona) अनेकांना आपल्या रोजगार गमवावा लागला. हातावर पोट असलेल्याची आर्थिक स्थिती अजुनही बिकट आहे. अशातच राज्यातील लहान आणि मध्यम कोचिंग क्‍लासेस मागील साडे सहा महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळं राज्यातील सुमारे १ लाख क्‍लासेस (classes) आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहेत. परिणामी राज्य सरकारनं (state government) अद्याप क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी न दिल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

राज्य सरकारने तातडीनं क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. अनलॉकनुसार (unlock) राज्य सरकार लॉकडाऊनचं नियम शिथील करत आहे. त्यानुसार विविध क्षेत्रांना सूट देण्यात आली आहे. मात्र, शाळा (school) आणि महाविद्यालयं (college) प्रत्यक्ष सुरू करण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही. त्यामुळं राज्यातील खासगी क्‍लासेस (private classes) चालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

क्‍लासेसना परवानगी देण्यात येत नसल्यानं सरकारची शिक्षणाच्या बाबतीत अनास्था असल्याचं दिसत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळं विद्यार्थी तणावाखाली आहेत. त्यामुळं त्यांना ऑफलाईन शिक्षणाची आवश्‍यकता आहे. हे लक्षात घेऊन सरकारनं काही अटी घालून खासगी क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा