Advertisement

रशियातील शैक्षणिक संधीवर मुंबईत मार्गदर्शन


रशियातील शैक्षणिक संधीवर मुंबईत मार्गदर्शन
SHARES

भारतीय विद्यार्थ्यांना रशियातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देण्यासाठी 'रशियन सेंटर ऑफ सायन्स अॅण्ड कल्चर'तर्फे पेडर रोड येथील रशियन दूतावासात 'रशियन एज्युकेशन फेयर'चे आयोजन कारणात आले होते. 'व्हाइस कॉन्सुलेट जनरल ऑफ रशियन फेडरेशन इन मुंबई'चे देमेंटिव व्लादिमीर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या फेयरच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना रशियातील शैक्षणिक संधींची माहिती देण्यात आली.

सध्या रशियात 10 हजार भारतीय विद्यार्थी विविध शैक्षणिक संस्थांत शिक्षण घेत आहेत. कोणत्याही शाखेत पदवीसाठी कमीत कमी 50 टक्के मार्क्स हे कोअर सब्जेक्ट आणि डिग्रीत असायला हवेत तसेच एस.सी, एस.टी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना कमीत कमी 40 टक्के मार्क्स असायला हवेत, असे निकष विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आले.

सध्या रशियातील ट्वेर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, वोल्गोगार्ड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, मॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स अॅण्ड टेक्नॉलॉजी आदी विविध विद्यापीठांत प्रवेश सुरु करण्यात आलेले आहेत.

मेडिकल, इंजिनीअरिंग, एव्हिएशन, एअरोस्पेस, न्यूक्लीअर पॉवर टेक्नॉलॉजी, पॉवर प्लांट मॅनेजमेंट इ. शैक्षणिक सुविधा भारतीय नागरिकांना उपलब्ध करण्यात येतील, असे या वेळी रशियन राजदूत यांच्यामार्फत सांगण्यात आले.

मुंबई, दिल्ली, कोलकाता, तिवेंद्रम आणि चेन्नई अशा भारतातील प्रमुख शहरांत या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे.

रशियन शैक्षणिक कार्यक्रम 2017 ची प्रमुख वैशिष्ट्ये -
- भारतीय विध्यार्थ्यांना रशियात शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे.
- विद्यापीठातील प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी यांच्याशी पालक आणि विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संवाद साधून देणे.
- इच्छुक विद्यार्थ्यांसाठी स्पॉट प्रवेशावरील प्रवेश सल्ला आणि सुविधा उपलब्ध करून देणे.
- विनामूल्य प्रवेश, विद्यार्थ्यांना मोफत हवाई तिकीटे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा