शैक्षणिक परिषदेचे आयोजन

 Borivali
शैक्षणिक परिषदेचे आयोजन
शैक्षणिक परिषदेचे आयोजन
See all

बोरिवली - भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेमध्ये ‘दर्जेदार शिक्षणाच्या जोरावर भारताचा कायापालट’ या विषयावर एकूण 60 शोधनिबंधांचं सादरीकरण झालं. शिवाय जवळपास १२० शिक्षकांनी या परिषदेमध्ये सहभाग घेतला. भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय आणि डॉ. एमएसजी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं ही परिषद आयोजित केली होती.

या परिषदेसाठी एमसीइएएमचे अध्यक्ष डॉ. एम. एस. गोसावी, सीएमएमइएस नाशिकचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पाठक, गोखले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. बी. पंडीत, उपाध्यक्ष डॉ. आर. जे. गुजराथी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. व्ही. संत आदी या वेळी उपस्थित होते.

Loading Comments 

Related News from शिक्षण