बालमोहनच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

 Dadar
बालमोहनच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
बालमोहनच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
बालमोहनच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
See all

दादर - बालमोहन विद्यामंदिर ही मराठी शाळा मुंबईतील प्रसिद्ध शाळांपैकी एक. 20 नोव्हेंबर रोजी 1991 च्या बॅचचं रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करण्यात आलं. या वेळी 1991 च्या बॅचचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित हाेते. ‘मुंबई लाइव्ह’च्या माध्यमातून परदेशी असलेल्या बालमोहनच्या अनेक विद्यार्थ्यांनी या रौप्य महोत्सवी सोहळ्याचा आनंद घेतला. या वेळी 1975-1976 च्या काळातील राजकीय, साहित्य, कला क्षेत्रातील अनेक ठळक घडामोडी चित्रफितीद्वारे दाखवण्यात आल्या. या बॅचमधील ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित विद्यार्थ्यांनी थोडे-थोडे पैसे काढून शाळेला भेटवस्तू देण्याचा संकल्प केला. त्याचबरोबर अवयव दानाविषयी जनजागृती केली. तर अनेकांनी या वेळी अवयव दानासाठी फॉर्मदेखील भरले.

Loading Comments