सम्यक विद्यार्थी आंदोलनचे रुईयात पहिले युनिट

 Kings Circle
सम्यक विद्यार्थी आंदोलनचे रुईयात पहिले युनिट
सम्यक विद्यार्थी आंदोलनचे रुईयात पहिले युनिट
See all

माटुंगा - प्रकाश आंबेडकर यांच्या सम्यक आंदोलन संघटनेचे पहिले युनिट रुईया महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अक्षय गुजर, मुंबई प्रदेश सचिव आकाश दोडके यांनी या युनिटची घोषणा केली. अध्यक्ष प्रतिक मोहन गाडे, उपाध्यक्ष ओमकार आनंद वायंगणकर, संघटक गौतम जाधव, सहसंघटक मुकिंद यशवंत कावळे, सेक्रेटरी तनमय भगवान वाघ, सहसेक्रेटरी मृणाल संतोष बनसोडे हे या युनिटमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांवर काम करणारायेत.

प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केलेली सम्यक आंदोलन संघटना 1980 सालापासून विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. परंतु या संघटनेची कोणतेही युनिट आजपर्यंत कोणत्याच महाविद्यालयात नव्हते. परंतु मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये लवकरच या संघटनेच्या शाखा सुरू करण्यात येणारायेत.

Loading Comments