शाळेची फी भरा, नाहीतर जमिनीवर बसा

कन्नमवारनगर -  विक्रोळीच्या मनोहर कोतवाल माध्यमिक विद्यालयातली ही मुलं...शाळेत शिकण्यासाठी आलेल्या या मुलांवर चक्क जमिनीवर बसण्याची वेळ येणार आहे..आणि तीही शाळेच्या एका तुघलकी निर्णयामुळे. पुढच्या पंधरा दिवसांत जर शाळेची फी भरली नाही तर या मुलांना जमिनीवर बसवण्याचा निर्णय शाळा प्रशासनानं घेतलाय..

शाळेच्या इमारतीची दुरवस्था तर आहेच पण शाळेमध्ये मुलभूत सुविधांचीही वानवा आहे. जर विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधाच मिळत नसेल तर आम्ही फी तरी का भरायची असा संतप्त सवाल पालकांनी केलाय.

Loading Comments