SHARE

शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्कूलबस. पण याकडेच वाहतूक विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्कूलबस असोसिएशनने केला आहे. स्कूलबस चालकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने काही नियम बनवण्यात आले आहेत. त्यातील महत्त्वाचा नियम म्हणजे 13 पेक्षा कमी आसन संख्या असणाऱ्या स्कूलबसला परवानगी देऊ नये. मात्र हा नियम पाळला जात नसल्याचे समोर आले आहे. 

13 पेक्षा कमी आसनसंख्या असणाऱ्या वाहनांना वाहतूक विभागाकडून परमिट दिले जात आहे. नियम असतानाही वाहतूक विभाग याकडे कानाडोळा का करत आहे? असा सवाल बस असोसिएशनने केला आहे. वाहतूक विभागाविरोधात बस असोसिएशनने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवारी स्कूलबस असोसिएशन न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

वाहतूक विभाग बस चालकांची चौकशी करते. पण व्हॅनची कोणतीही चौकशी करत नाही. स्कूलबसबरोबर स्कूलव्हॅनचीही चौकशी होणे आवश्यक आहे. हा लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही येत्या गुरुवारी या विरोधात न्यायलयात याचिका दाखल करणार आहोत.

अनिल गर्ग, अध्यक्ष स्कूलबस असोसिएशनहेही वाचा - 

स्कूलबसमध्ये महिला बसवाहक नेमणार


संबंधित विषय
ताज्या बातम्या