Advertisement

विद्यार्थ्यांच्या पाठीवर नोटांचे ओझे


विद्यार्थ्यांच्या पाठीवर नोटांचे ओझे
SHARES

भांडुप - 500, 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांनी वेगवेगळ्या शकला लढवण्यास सुरुवात केलीय. असाच एक प्रकार भांडुपच्या अमर कोर विद्यालयातल्या विद्यार्थ्यांकडून उघडकीस आलाय. शाळा प्रशासनानं चक्क 500 रुपयांच्या नोटा विद्यार्थ्यांच्या हातात दिल्या आणि याचे सुट्टे करून आणा, असं सागितलं. आधीच सुट्ट्या पैशांचे वादे आणि स्वतःकडील 500, 1000 रुपयांच्या नोटा बदली करून मिळत नाहीत. त्यातच शाळेनं आपल्या पाल्यावर जबाबदारी टाकल्यानं पालक आणखीनच वैतागले.

दहावीच्या परिक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकडून शाळेनं ऑक्टोबर महिन्यात दहावी बोर्ड परीक्षा फी म्हणून 405 आणि पुन्हा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकडून 415 रुपये शुल्क जमा केले होते. शाळेमध्ये दहावी इयत्तेत 213 विद्यार्थी असून 206 विद्यार्थ्यांनी 500 रुपयाच्या नोटा देऊन शुल्क भरले होते. त्यातील 169 विद्यार्थ्यांना नोटा बदलून आणण्यासाठी परत दिल्याचं शाळेचं म्हणणं आहे. पण ऑक्टोबरमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेली फी नोव्हेंबर उजाडला तरी बोर्डाकडे जमा का नाही केली? असा प्रश्न पालक विचारतायेत.

"विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या नोटा विद्यार्थ्यांना पुन्हा देण्यात आल्यात. मुलांनी कधीही या नोटा बदलून किंवा सुट्टे पैसे आणून द्यावेत. पण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून सध्या आम्ही शाळेतर्फे पैसे भरणार आहोत," असं शाळेचे संचालक मारुती म्हात्रे यांनी स्पष्ट केलंय. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा