विद्यार्थांना मोफत गणवेश वाटप

 Ghatkopar
विद्यार्थांना मोफत गणवेश वाटप

घाटकोपर - घाटकोपर पश्चिम येथील ज्ञानसागर विद्यामंदिर शाळेत बुधवारी गणवेशाचे मोफत वाटप करण्यात आले. सहाय्यक पोलीस उपायुक्त भीमदत्त राठोड यांच्या हस्ते गणवेशाचे वाटप केले गेले. शहीद विजय साळस्कर प्रतिष्ठानच्या वतीने हा सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आला होता. विद्यार्थांना मदतीचा हात हे या प्रतिष्ठानचे ध्येय आहे. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश साळस्कर, शाळेचे मुख्याध्यापक घाटगे उपस्थित होते. राठोड यांनी मुलांसमोर त्यांच्या लहानपणीच्या आठवणी उलगडल्या. वाचन आणि लेखनाने स्वत: ला हुशार बनवा. नेहमी चांगल्या गोष्टी आत्मसात करून ध्येय दृष्टी चाणाक्ष ठेवा असं मोलाचे मार्गदर्शन राठोड यांनी केले.

Loading Comments