Advertisement

दिवाळीनंतर स्कूल व्हॅन बंद होणार?

दिवाळीच्या सुट्ट्यांनतर नियमांना धरून ज्या स्कूल व्हॅन नसतील, अशा स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यात येणार आहे. १३ सीट पेक्षा कमी सीट असणाऱ्या स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यात येणार आहे.

दिवाळीनंतर स्कूल व्हॅन बंद होणार?
SHARES

गेले काही दिवस राज्यातील स्कूल बस असोसिएशनने स्कूल व्हॅनवर कारवाई करावी यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, आता स्कूल बस असोसिएशनला न्याय मिळाला आहे. नियमांना धरून न चालणाऱ्या स्कूल व्हॅनवर कारवाई करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

नियमांना धरून न चालणाऱ्या स्कूल व्हॅनवर कारवाई करावी, अशी मागणी काही दिवसांपासून स्कूल बस असोसिएशनकडून सातत्याने होत होती. अनेक वेळा याविरोधात कोर्टातही याचिका दाखल केली होती. स्कूलबस चालकांविरोधात स्कूल बस असोसिएशनने संपही पुकारला होता. गेल्या एक वर्षाच्या लढ्यानंतर अखेर स्कूलबस असोसिएशनला न्याय मिळाला आहे. स्कूल व्हॅनने नियम न पाळल्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा स्कूल व्हॅनवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. या स्कूल बस असोसिएशनची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. ८ सप्टेंबर २०१६च्या नियमानुसार १३ पेक्षा कमी आसनसंख्या असणाऱ्या स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यात येणार आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांनतर नियमांना धरून ज्या स्कूल व्हॅन काम करत नसतील, अशा स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यात येणार आहे. १३ सीट पेक्षा कमी सीट असणाऱ्या स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यात येणार आहे. दिवाळीच्या सुटट्यांनतर याबाबत स्कूल व्हॅन बंद करण्याबाबत ऑर्डर काढण्यात येणार आहे.

गेल्या एक वर्षापासून आम्ही मुलांच्या सुरक्षेकरता लढत होतो. स्कूल व्हॅनही नियमांना धरून चालत नाहीत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला. स्कूल व्हॅन आणि स्कूल बस यांना वेगवेगळे नियम का? याबबात अनेक वेळा आम्ही कोर्टात याचिकाही दाखल केली होती. 

अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस असोसिएशन


स्कूल बस आणि व्हॅनसाठी नियम

१. शालेय बसमध्ये प्रशिक्षित चालक असणे

२. चालकास 5 वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव असणे

३. स्कूल व्हॅन/बसचा शाळेशी करार असणे बंधनकारक

४. वाहतुकीच्या कोणत्याही गुन्ह्यासाठी त्याला दंड झालेला नसावा

५. वाहतुकीचा परवाना असावा

६. ती बस फक्त शाळेच्या वापरासाठी असावी

७. स्कूल व्हॅन किंवा स्कूल बसमध्ये १३ पेक्षा जास्त आसनसंख्या असावी

८. स्कूलबस 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या नसाव्यात

९. बसमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी नसावेत

१०. प्रत्येक बसमध्ये सुरक्षा खांब, संकटसमयी बाहेर पडण्याचा मार्ग (आपत्कालीन खिडकी), प्रथमोपचार संच आणि अग्निशमन यंत्र असावे

११. किमान दोन अटेंडंट बसमध्ये असायला हवेत.



हेही वाचा

का घेतला स्कूलबस चालकांनी संप मागे?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा