स्कूलबस चालकांचा संप मागे

 Mumbai
स्कूलबस चालकांचा संप मागे

मुंबईत बेकायदा धावणाऱ्या स्कूल व्हॅन विरोधात स्कूलबस चालकांनी 1 ऑगस्टपासून संप पुकारला होता. तो संप मागे घेण्यात आला आहे. परिवहन आयुक्तांनी स्कूल व्हॅन विरोधात कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.

संप मागे घेतल्यामुळे विद्यार्थी पालकांना दिलासा मिळाला आहे. 1 ऑगस्टपासून स्कूलबस ओनर्स असोसिएशनने संपावर जाण्याची घोषणा केली होती. सोमवारी यासंदर्भात परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी विशेष बैठक बोलावली. त्यावेळी स्कूलबस संप मागे घेण्यात आला. यावेळी स्कूलबस ओनर्सने आपल्या मागण्या मांडल्या. या मागण्यांची आयुक्तांनी दखल घेतली. स्कूल व्हॅनवर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले.


विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता राज्यसरकारतर्फे स्कूल बससाठी काही धोरण ठरवले होते. याच धोरणांची स्कूल व्हॅननेसुद्धा अंमलबजावणी करणे आवश्यक होते. मात्र स्कूल व्हॅन यातील कोणतेच धोरण अंमलात आणत नसल्यामुळे स्कूलबस असोसिएशने संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.


आयुक्तांसमोर आम्ही आमच्या मागण्या मांडल्या. स्कूल व्हॅनने नियम अंमलात न आणल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होता. आयुक्तांनी आमच्या मागण्या मान्य करत स्कूल व्हॅनवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे आम्ही संप मागे घेतला आहे.
- अनिल गर्ग, अध्यक्ष स्कूल बस असोसिएशन


हेही वाचा -

स्कूलबसमधल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?


Loading Comments