विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन

 Dahisar
विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन
विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन
विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन
विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन
विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन
See all

दहिसर - विद्यामंदिर हायस्कूलमध्ये वॉर्डस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये एकूण 83 शाळांनी सहभाग घेतला. या वेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग दाखवले. टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर कसा करता येईल हे प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांनी दाखवलं. गुरुवार ते शनिवार हे तीन दिवस विज्ञान प्रदर्शन खुले राहणाराय. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ शरद काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनात आयोजित करण्यात आलेले प्रकल्प शाळेत राबवता येतील, असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ शरद काळे यांनी व्यक्त केलं. या वेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, पश्चिम विभागाचे शिक्षण निरिक्षक नितीन बच्छाव आणि विद्या प्रसारक मंडळाचे प्रफुल्ल ठाकरे आदी उपस्थित होते.

Loading Comments