Advertisement

अभाविप 'सेल्फी with कॅम्पस' अभियान राबवणार


अभाविप 'सेल्फी with कॅम्पस' अभियान राबवणार
SHARES

अखिल भारतीय विदयार्थी परिषद यावर्षी देशभरातील १ लाख महाविद्यालयांत 'सेल्फी with कॅम्पस' संपर्क अभियान राबविणार अाहे. मुंबई पत्रकार संघात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात अाली.  या अभियानाच्या माध्यमातून अभाविपचे कार्यकर्ते ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत देशभरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांना भेटी देणार अाहेत. या पत्रकार परिषदेला अभाविप मुंबई महानगराचे मंत्री रवी जयस्वाल, कोकण प्रदेश मंत्री व केंद्रीय कार्य समिती सदस्य अनिकेत ओव्हाळ  उपस्थित होते

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक २८,२९,३० मे दरम्यान अासाममधील गुवाहाटी  येथे झाली. या बैठकीत देशभरातील सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी  शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती, ईशान्य भारतातील विकास यावर चर्चा झाली. तीन दिवसीय बैठकीत विद्यार्थी अाणि समाजाचे हित लक्षात घेत अभियान, कार्यक्रम व आंदोलनांद्वारे अभाविपच्या पुढील शैक्षणिक सत्राची दिशा ठरविण्यात आली.


संवाद अभियान

अभाविप अनुसूचित जाती, जमाती विद्यार्थी ‘संवाद अभियान’ सप्टेंबरमध्ये राबवणार अाहे. या अभियानाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती वसतिगृहात जाऊन अभाविप विद्यार्थ्यांशी संवाद साधणार अाहे.


मिशन साहसी

महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मुंबई येथे झालेला ‘मिशन साहसी’ आत्मरक्षा प्रशिक्षण अभियान अभाविप देशभरातील कॉलेज कॅम्पसमध्ये राबवणार अाहे.  या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरे व त्याचे भव्य प्रकटीकरणाचे कार्यक्रम सर्वच प्रमुख शहरात होणार आहेत. त्यानुसार नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ३० ऑक्टोबर रोजी देशभरातील १००० स्थानांवर प्रशिक्षणाचे भव्य कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. हेही वाचा -

विद्यापीठातील शिक्षकांना अाता पीएचडी बंधनकारक

मुंबईकरांचं पाणी ५१ पैशांनी महागलं!
संबंधित विषय