Advertisement

मुंबईकरांचं पाणी ५१ पैशांनी महागलं!

महापालिकेने पाण्याच्या शुल्कात केवळ १४ पैशांनी वाढ केली असली, तरी जल आकार आणि ७० टक्के मलनि: सारण कर गृहीत धरता ही दरवाढ ५१ पैशांवर जात आहे. या दरवाढीला महापालिकेच्या स्थायी समितीने औपचारिक मंजुरी दिली असून येत्या १६ जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

मुंबईकरांचं पाणी ५१ पैशांनी महागलं!
SHARES

मुंबई महापालिकेने गुरूवारी पाणी पुरवठ्याच्या शुल्कात वाढ केल्याने मुंबईकरांना लवकरच वाढीव पाणी बिल भरावं लागणार आहे. महापालिकेने पाण्याच्या शुल्कात केवळ १४ पैशांनी वाढ केली असली, तरी जल आकार आणि ७० टक्के मलनि: सारण कर गृहीत धरता ही दरवाढ ५१ पैशांवर जात आहे. या दरवाढीला महापालिकेच्या स्थायी समितीने औपचारिक मंजुरी दिली असून येत्या १६ जूनपासून पाण्याच्या बिलात नवीन आकारणी सुरू होणार आहे.


दरवर्षी ८ टक्क्यांपर्यंत वाढ

महापालिकेच्या जलअभियंता खात्याचा आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, प्रचलन व देखभाल खर्च, विद्युत खर्च तसंच शासकीय धरणातून करण्यात येणाऱ्या पाणीपट्टीच्या एकत्रित खर्चात वाढ होत असल्यामुळे पाण्याच्या शुल्कात दरवर्षी जास्तीत जास्त ८ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याला ९ मे २०१२ च्या सभेत स्थायी समितीने मंजुरीही दिलेली आहे. त्यामुळे दरवर्षी १६ जूनपासून पाण्याच्या शुल्कात वाढ केली जाते.

महापालिका आयुक्तांना हे अधिकार बहाल करण्यात आलेले आहे. केवळ या वाढीव शुल्काची माहिती औपचारिकता म्हणून स्थायी समितीला देण्यात येते. त्यानुसार जलअभियंता विभागानं वाढवण्यात येणाऱ्या शुल्काची माहिती समितीला सादर केली.किती कर आकारणार?

सध्या झोपडपट्टी व आदिवासी पाड्यांमधील घरगुती ग्राहकांना ३.६८ रुपये आणि त्यावर ७० टक्के मलनि: सारण कर लावला जातो. तो आता ३.८२ रुपये त्यावर ७० टक्के मलनि: सारण कर लावला जाणार आहे. तर प्रकल्पबाधितांच्या इमारतींमध्ये सध्या ४.०८ रुपये एवढा कर लावला जातो. तो आता ४.२३ रुपये आणि त्यावर ७० टक्के एवढा लावला जाणार आहे.


'अशी' होणार वाढ

सध्या १ हजार लिटर पाण्यासाठी सर्व शुल्क धरून १३.६३ रुपये आकारण्यात येतात. त्यात १४ पैशांची वाढ होणार असली, तरी प्रत्यक्षात जल आकार आणि ७० टक्के मलनि:सारण कर धरून ५१ पैशांनी वाढ होणार आहे. त्यामुळे १ हजार लिटर पाण्यामागे मुंबईकरांना १४.१४ रुपये मोजावे लागतील.


कधीपासून दरवाढ?

ही दरवाढ १६ जून २०१८ पासून लागू होणार अाहे. या आर्थिक वर्षात दरवाढीमुळे महापालिकेच्या तिजोरीत ४१.३३ कोटी रुपयांची भर पडणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली. या दरवाढीला स्थायी समिती अध्यक्ष यांनी हे निवेदन मंजुरी दिली. तर काँग्रेसचे आसिफ झकेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव, सपाचे रईस शेख यांनी विरोध दर्शवला.


आस्थापना खर्च ३ टक्यांनी वाढला

जलअभियंता विभागाचा आस्थापना खर्च हा सन २०१६-१७मध्ये ८०६.५६ कोटी रुपये होता तर सन २०१७-१८ मध्ये हा आस्थापना खर्च ८३६.६० कोटी एवढा झाला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत आस्थापना खर्चात ३.७२ टक्यांनी वाढ झाली आहे. परंतु पाण्याच्या शुल्कात ८ टक्यांपर्यंत वाढ केली जात आहे.


प्रति १ हजार लिटरसाठी वाढीव शुल्क दर

  • घरगुती ग्राहकांसाठी : ३.८२ ते ५.०९ रुपये
  • बिगर व्यापारी संस्थासाठी : २०.४० रुपये
  • व्यावसायिक संस्था : ३८.२५ रुपये
  • व्यावसायिक संस्था-उद्योगधंदे : ५०.९९ रुपये
  • रेसकोर्स व तारांकित हॉटेल : ७६.४९ रुपयेहेही वाचा-

तुंबईच्या ठिकाणी पूरनियंत्रण अधिकारी?

तर, मुंबईतील गुंतवणूक करणारे इतर शहरात जातीलRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा