Advertisement

‘सेट’ परीक्षा होणार २८ जूनला

‘सेट’ परीक्षा २८ जून रोजी घेण्यात येणार आहे.

‘सेट’ परीक्षा होणार २८ जूनला
SHARES

महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहायक प्राध्यापक होण्यासाठी घेण्यात येणारी 'सेट' परीक्षा आता सुधारीत वेळापत्रकानुसार २८ जून २०२० रोजी होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) नेट परीक्षा २० जून रोजी संपणार आहे.

पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा २१ जून रोजी होणार होती. त्यामुळं विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये किंवा विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहू नये, यासाठी ही परीक्षा २८ जून रोजी घेण्यात येणार आहे. 'सेट' परीक्षेची प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबविण्यात येते.

याबाबत सविस्तर माहिती http://setexam.unipune.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे.



हेही वाचा -

हिंमत असेल तर अटक करून दाखवा- प्रकाश आंबेडकर

एसटी प्रवासभाडं सवलतीसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास मुदतवाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा