Advertisement

शारदाश्रम शाळेच्या नावात बदल नाहीच!

फक्त अंतर्गत सोयीसाठी 'एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल' हे नाव धारण केले असून इतर सर्व ठिकाणी शारदाश्रम विद्यामंदिर हेच नाव कायम राहील, असंही संस्थेकडून सांगण्यात आलं आहे.

शारदाश्रम शाळेच्या नावात बदल नाहीच!
SHARES

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा देऊन त्यांना पुढे जाता यावे या हेतूने दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेने आयसीएसई अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. तसेच, हा निर्णय एकाकी वा अचानक घेतला नसून याची माहिती पालकांना वेळोवेळी दिल्याचा दावाही संस्थेद्वारे करण्यात आला आहे.

दरम्यान, फक्त अंतर्गत सोयीसाठी 'एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल' हे नाव धारण केले असून इतर सर्व ठिकाणी शारदाश्रम विद्यामंदिर हेच नाव कायम राहील, असंही संस्थेकडून सांगण्यात आलं आहे.


आयसीएसई अभ्यासक्रमावर पालकांचे एकमत

अभ्यासक्रम बदलाबाबत सर्व पालकांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्याशी चर्चा करूनच आयसीएसई किंवा सीबीएसई अभ्यासक्रम निवडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी आयसीएसई अभ्यासक्रमावर सर्व पालकांचे एकमत झाले होते, असेही शाळेने सांगितले आहे.


परवानगी घेऊनच अभ्याक्रमाला सुरूवात

दरम्यान, या संस्थेने ५ नोव्हेंबर २०१६ च्या कार्यकारिणी मंडळाच्या सभेत आयसीएसई किंवा सीबीएसई शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करण्याचे ठरवले. यासाठी शैक्षणिक क्षेत्रात नामांकित असलेल्या मेसर्स फ्लोक्स एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची मदत घेण्याचा निर्णय घेतला.


प्रस्तावाला सरकारची मान्यता

या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक तो प्रस्ताव मंजूर करून २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते पाचवीसाठी आयसीएसईचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभ्यासक्रमासाठी संस्थेने २६ जुलै २०१७ रोजी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला सरकारने १३ नोव्हेंबर २०१७ रोजी मान्यता दिल्याचेही संस्थेने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.हेही वाचा

शारदाश्रमच्या 'इंटरनॅशनल' शाळेला परवानगीच नाही!


संबंधित विषय
Advertisement