Advertisement

विद्यापीठाच्या इतर जागाही लवकर भरा - आदित्य ठाकरे


विद्यापीठाच्या इतर जागाही लवकर भरा - आदित्य ठाकरे
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जागा भरल्यानंतर लवकरात लवकर विद्यापीठाच्या इतर महत्त्वाच्या पदांवर कायमस्वरूपी अधिकारी नेमावेत अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी डॉ. सुहास पेडणेकर यांची विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती केली होती.


'सिनेट सदस्यांकडून मदत मिळावी'

या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी डॉ. सुहास पेडणेकर यांची कुलगुरूपदी निवड केल्याबद्दल राज्यपालांचे आभार व्यक्त केले. तसेच विद्यार्थी व विद्यापीठाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करताना राज्यपालांनी युवासेना तसेच सिनेट सदस्यांकडून मदत मिळावी, अशी अपेक्षाही वर्तवली आहे.



दरम्यान, कुलगुरूंच्या नियुक्तीनंतर आता प्र-कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रक या पदांसाठीही लवकरच नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केल्याचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.



हेही वाचा

नव्या कुलगुरूंचंही 'टार्गेट रिझल्ट'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा