जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जोगेश्वरीची शाळा अव्वल

 CHARKOP
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जोगेश्वरीची शाळा अव्वल
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जोगेश्वरीची शाळा अव्वल
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जोगेश्वरीची शाळा अव्वल
See all

चारकोप - सेक्टर 2 परिसरातल्या ऑक्सफर्ड विद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षिस समारंभ झाला. या विज्ञान प्रदर्शनात जोगेश्वरीतल्या श्रमिक विद्यालयाला सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून बहुमान प्रदान करण्यात आला.

श्रमिक विद्यालयाने वाहतूक आणि दळणवळण या विषयावर प्रयोग सादर केला. शाळेच्या मुख्याध्यापक एन. एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. या प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी प्रियांका मेजारी, तुषार शेलार या विद्यार्थ्यानी तसेच विज्ञान शिक्षक शंकर खरवडे, संदीप फणसेकर आणि उत्कर्षा कोरे यांनी अथक परिश्रम घेतले. श्रमिक शाळेच्या निसर्गमंडळालाही प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

Loading Comments