मुंबईतल्या वरळीमधील गरजु विद्यार्थिनींना आता शाळेत जाण्यासाठी शालेय बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. संकल्प प्रतिष्ठानाच्या वतीनं विद्यार्थिनींसाठी विनामुल्य शालेय बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं या विभागातील शालेय विद्यार्थिनींना दिलासा मिळाला आहे.
शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विनामूल्य शालेय बससेवेचे उद्घाटन जिजामाता नगर इथं करण्यात आलं आहे. जिजामाता नगर, वरळी नाका, व्ही. पी. नगर, मद्रास वाडी, वरळी डेअरी क्वार्टर्स आणि महानगरपालिका वरळी सी फेस शाळा असा या बसचा मार्ग असणार आहे.
जिजामाता नगर प्रवेशद्वार इथं या बससेवेचं उद्घाटन झालं. त्यावेळी आदित्या ठाकरेंसह नुकताच शिवसेना पक्षात प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि संकल्प प्रतिष्ठानच्या संगीता अहिर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
हेही वाचा -
युती अभेद्य, येत्या १५ दिवसांत जागावाटपाचा निर्णय- मुख्यमंत्री
ऑगस्टपासून नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी