कठोर मेहनतीचे नाव आहे श्रेयस कौशिक!

  Kandivali East
  कठोर मेहनतीचे नाव आहे श्रेयस कौशिक!
  मुंबई  -  

  मंगळवारी राज्यातील 12 वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल घोषित झाले. या निकालात ठाकूर विद्या मंदिर कॉलेजधील श्रेयस कौशिकने 96.30 टक्के मिळवून मुंबईत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या यशाने केवळ कौशिक कुटुंबाचेच नव्हे, तर कॉलेजचे नावही उंचावले आहे.

  एचएससी परीक्षेत 75 हून अधिक टक्केवारी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 36 हजार 354 इतकी आहे. या वाढलेल्या टक्केवारीच्या जोरावरच बोर्डाने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्तम प्रदर्शन केले आहे.

  मुंबईत टक्केवारीमध्ये पहिला क्रमांक पटकावणाऱ्या श्रेयसने चांगले गुण मिळवण्यासाठी अथक मेहनत घेतली आहे. बरेचसे विद्यार्थी परीक्षा तोंडावर आल्यावर अभ्यास सुरू करतात. पण श्रेयसने 12 वीत प्रवेश करताक्षणीच अभ्यासाला सुरूवात केली. दररोज आठ तास अभ्यास केल्याचे फळ त्याला परीक्षेत मिळाले आहे.

  12 वीत घवघवीत यश मिळवल्यानंतर श्रेयसला आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मधून इंजिनिअरिंग करायचे आहे. त्यासाठी आवश्यक प्रवेश परीक्षेची तयारीही श्रेयसने केली आहे. श्रेयसच्या यशामुळे त्याचे शिक्षक, कुटुंबीय आणि विद्यार्थी मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्रेयसने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.