Advertisement

महापालिकेच्या शाळांमधील मुलांना मिळणार स्पोर्ट्स युनिफॉर्म


महापालिकेच्या शाळांमधील मुलांना मिळणार स्पोर्ट्स युनिफॉर्म
SHARES
Advertisement

खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणांतर्गत खेळासाठी स्वतंत्र गणवेष दिले जात असतानाच आता अशाच प्रकारे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनाही क्रीडा गणवेश (स्पोर्ट्स युनिफॉर्म) दिले जाणार आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासूनच हे क्रीडा गणवेष दिले जाणार आहेत. ज्युनियर केजी ते दहावी पर्यंतच्या महापालिका शाळेतील मुलांना त्यांच्या इयत्तेनुसार लाल, निळा, हिरवा तसेच पिवळ्या रंगात हे क्रीडा गणवेष दिले जाणार आहेत. त्यामुळे खासगी शाळांच्या मुलांप्रमाणे महापालिकेच्या शाळांमधील मुलेही रंगीबेरंगी कपड्यांमध्ये दिसणार आहेत.

महापालिका शाळांमधील मुलांना २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. शिक्षणाबरोबरच विविध खेळात नैपुण्य दाखवत असल्यामुळे खेळातही त्यांना उत्तेजन देण्यात यावे. यासाठी महापालिका शाळांमधील मुलांना मोफत साहित्यांच्या संचामध्ये क्रीडा साहित्यासमवेत क्रीडा गणवेषाचाही समावेश करण्याची मागणी सपाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी ठरावाच्या सूचनेद्वार केली होती. यावर प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे.३,३०,९३५ मुलांना क्रीडा गणवेष

या वर्षापासून नियमित ज्युनिअर केजी ते इयत्ता १० वीच्या एकूण ३ लाख ३० हजार ९३५ प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व मुलांना त्यांच्या हाऊसनुसार लाल, निळा, हिरवा व पिवळा अशा रंगात ट्रॅक पँट व टी शर्ट आणि बूट अशा स्वरुपात क्रीडा गणवेष दिला जाईल, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले.आर्थिक तरतूद

क्रीडा गणवेशासाठी चालू अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून खरेदीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला आहे. ही मंजुरी प्राप्त झाल्यानंतर या वर्षापासूनच मुलांना नियमित क्रीडा गणवेष देण्यात येईल.क्रीडा साहित्यांची खरेदी

महापालिका शाळांमधील मुलांना २७ शालेय वस्तू मोफत देण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर शारीरिक शिक्षणांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक ज्युडो, कुस्ती, तायक्वाँदो मॅट, बॉक्सिंग रिंग व मैदानी खेळ इत्यादी क्रीडा साहित्यांची खरेदी मागील वर्षापासून करण्यास सुरुवात केली आहे.क्रीडा क्षेत्राकडे वळण्याची आवड

शारीरिक शिक्षणाच्या तासिकांमध्ये कुठल्याही प्रकारचा खेळ खेळताना सर्व शारीरिक हालचाली मुक्तपणे करता येतील व त्यायोगे शालेय मुलांमध्ये क्रीडा गणवेषात खेळणे हा वेगळाच अनुभव व आनंद घेऊन क्रीडा क्षेत्राकडे वळण्याची आवड निर्माण होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.महापालिका शाळांमधील मुले व मुली : ३ लाख ३० हजार ९३५
शाळांची माध्यमे : ८ माध्यमे
एकूण शालेय इमारती : ११००डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement