दहावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन स्वीकारणार


SHARE

मुंबई - मुख्याध्यापक संघटनेनं दहावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन भरण्यासंदर्भात काही अडचणी नोंदवल्या होत्या. मुख्याध्यापक संघटनेच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील असं स्पष्ट केलंय. आवश्यक त्या दुरुस्त्या 19 फेब्रुवारीपर्यंत करण्यात याव्यात, असंही मंडळानं सांगितलंय. मार्च 2017मध्ये होणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीनं स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. काही तांत्रिक अडचणी असल्यास त्याची माहिती कार्यालयास देण्यात यावी, असे आदेशही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या