Advertisement

दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर!

दहावीच्या फेरपरीक्षेकरीता मुंबई विभागातून एकूण ३३ हजार ८७९ विद्यार्थी बसले होते. दहावीची फेरपरीक्षा १७ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. या फेरपरीक्षेच्या निकालासाठी दहावीच्या नियमित परीक्षेत नापास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे.

दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर!
SHARES

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल बुधवारी २९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दहावीच्या जुलै-ऑगस्ट २०१८ दरम्यान झालेल्या फेरपरीक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनं पाहता येईल. विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर पाहता येईल.

किती विद्यार्थी?

दहावीच्या फेरपरीक्षेकरीता मुंबई विभागातून एकूण ३३ हजार ८७९ विद्यार्थी बसले होते. दहावीची फेरपरीक्षा १७ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. या फेरपरीक्षेच्या निकालासाठी दहावीच्या नियमित परीक्षेत नापास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे.

गुणपडताळणी कधी?

यंदाच्या जुलै-ऑगस्ट २०१८ या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या ३० ऑगस्टपासून ८ सप्टेंबरपर्यंत गुणपडताळणीसाठी बोर्डाकडे अर्ज करता येणार आहेत. तसंच ३० ऑगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या कॉपीसाठी अर्ज करता येतील. जे विद्यार्थी या परीक्षेत अनुउत्तीर्ण झाले आहेत त्यांना मार्च २०१९ या परीक्षेेसाठी अर्ज करता येणार असून त्याची तारीख लवकरच शिक्षण मंडळ जाहीर करणार आहे.

बारावी फेरपरीक्षेचा निकाल 'असा'

शुक्रवारी २४ ऑगस्टला बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेला मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागातून १ लाख ०२ हजार १६० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परंतु त्यापैकी २३ हजार १४० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून या निकालाची एकूण टक्केवारी २२.६५ टक्के इतकी कमी आहे.

हेही वाचा-

१७ नंबरचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

आयडॉल प्रवेशाचा गोंधळ सुरूच

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा