Advertisement

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे नववीचे वार्षिक परीक्षेचे गुण तसेच दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण यावर आधारित मूल्यांकन करण्यात येणार आहे.

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार
SHARES

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी १६ जुलै रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजता हा निकाल पाहता येईल. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आला आहे. दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्य सरकारनं दहावीच्या परीक्षा कोरोनाची दुसरी लाट आल्याने रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे नववीचे वार्षिक परीक्षेचे गुण तसेच दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण यावर आधारित मूल्यांकन करण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशांसाठी ऐच्छिक सीईटी घेतली जाणार आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी तर ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थिनी होत्या.

इथे पहा निकाल

http://result.mh-ssc.ac.in आणि www.mahahsscsscboard.in या राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा