Advertisement

मेहनतीला मिळालं यश, दहावी परीक्षेत मिळाले ९९.६० टक्के

कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारी १६ वर्षाच्या या मुलीनं दहावीच्या परीक्षेत ९९.६० टक्के मिळवले आहेत.

मेहनतीला मिळालं यश, दहावी परीक्षेत मिळाले ९९.६० टक्के
SHARES

बुधवारी महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यावेळीही मुलींनी बाजी मारली. ९६.९१ टक्के मुली आणि ९३.९० टक्के मुलं उत्तीर्ण झाली. या वेळी राज्यात सुमारे दहा लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. गतवर्षी प्रमाणे यंदाही कोकण विभाग (मंडळ) अव्वल आले. कोकण विभागात एकूण ९८.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

कांदिवली पूर्वेकडील ठाकूर विद्या मंदिर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारी १६ वर्षाची समीरा सुर्वे यांच्या घरातही आनंदाचं वातावरण आहे. समीराला दहावीच्या परीक्षेत एकूण ४९८ गुण मिळाले. ४९८ गुणांपैकी ४८३ गुण परीक्षेसाठी मिळाले आहेत. तर १५ गुण शास्त्रीय कलेत मिळाले आहेत.

हेही वाचा : सिद्धार्थ महाविद्यालयाला डागडुजीसाठी १२ कोटींचा निधी

इतकेच नाही तर समीरानं आपल्या मेहनतीनं सर्व विषयांत ९० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. समीराला इंग्रजीत ९०, संस्कृतमध्ये ९९, मराठीत ९४, गणितामध्ये ९७, विज्ञानात ९६ आणि सामाजिक विज्ञानात ९७ गुण मिळाले आहेत. 

                                                                             

समीरा सुर्वे सांगते की "मी दररोज किमान दोन तास अभ्यास करायचे. त्याचबरोबर भाषांवर प्रभुत्व मिळावं म्हणून मी अभ्यासा व्यतिरिक्त बऱ्याच पुस्तकांचं वाचन करायचे. गणितातील प्रश्न देखील मी स्वत: सोडवण्याचा प्रयत्न करायचे. माझ्या आई-वडिलांकडून मला नेहमीच पाठिंबा मिळाला. त्यांनी मला कधी फक्त अभ्यास करण्यासाठी दबाव नाही टाकला. अभ्यासासोबत बाकी गोष्टी करण्यासाठी देखील त्यांनी प्रोत्साहन दिलं."



हेही वाचा

Medical Exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप नाहीच, राज्य सरकार मांडणार बाजू

१ ऑगस्टपासून सुरू होणार आयटीआय प्रवेश प्रक्रिया

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा