Advertisement

सेंट जोसेफ शाळेच्या आवारात सर्रास विकला जातोय गुटखा


सेंट जोसेफ शाळेच्या आवारात सर्रास विकला जातोय गुटखा
SHARES

मुंबईत गुटखाबंदी फक्त नावालाच झाली आहे असे चित्र सध्या दिसतय. शाळेच्या परिसरात दारू, गुटखा, तंबाखू आणि सिगारेट यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. मात्र आजही शाळा परिसरात सर्रास गुटखा आणि दारूची विक्री होताना दिसत आहे. जुहूच्या सेंट जोसेफ शाळेच्या परिसरात अशाचप्रकारे अवैधरित्या दारू आणि गुटख्याची विक्री सुरू आहे.



नियम पायदळी तुडवले

या विरोधात शाळा प्रशासनाने अनेक वेळा तक्रार केली. पण तरीही या दुकानांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शाळेच्या १०० मीटरपर्यंतच्या आवारात दारूच्या विक्रीला बंदी आहे. मात्र हा नियम सेंट जोसेफ शाळेच्या परिसरात पायदळी तुडवला जात आहे.

शाळेच्या परिसरातून ही दुकाने हद्दपार करावेत याकरता शाळा प्रशासनाने अनेक वेळा पालिकेच्या उत्पादन शुल्क विभागाला पत्र लिहिली. मात्र उत्पादन शुल्क विभागाकडून आलेल्या उत्तरामुळे शाळा प्रशासनाला धक्काच बसला. उत्पादन शुल्क विभाग म्हणते, ‘धार्मिक आणि शैक्षणिक संस्थेच्याजवळ बेकायदा मद्य परवाने मंजूर केले. याबाबत कार्यालयास तक्रार प्राप्त झालेली आहे. तरी आपल्या संस्थेच्या जागेत कंपाऊंडमध्ये प्रवेश करण्यास एकूण किती गेट अधिकृतरित्या मंजूर आहेत, याची माहिती पाठवावी'. उत्पादन शुल्क विभागाकडून आलेल्या या पत्रामुळे शाळा प्रशासन चक्रावले आहे. शाळेच्या परिसरात असलेल्या दारूच्या दुकानांवर बंदी आणण्याऐवजी उत्पादन शुल्क विभाग शाळेच्या गेटसंदर्भात विचारत असल्याने शाळा प्रशासन गोंधळात आहे.


शाळेच्या १०० मीटर परिसरात गुटखा, दारू विक्रीला बंदी आहे. मात्र सेंट जोसफ शाळेच्या परिसरात याची सर्रास विक्री केली जात आहे. वारंवार तक्रार करूनही यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उत्पादन शुल्क विभागाकडून या तक्रारीवर आलेेले उत्तर वाचून शाळेला असलेले गेट आणि दारूच्या दुकानांचा काय संबंध हे कळत नाही. लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी. अशी मागणी आम्ही केली आहे. या सगळ्याचा शाळेत येणाऱ्या मुलांवर वाईट परिणाम होत आहे.
- गॉडफ्रे पामेंटा, ट्रस्टी



हेही वाचा -

बिडी, सिगारेटच्या दुकानांवर बिस्किट-चॉकलेट विक्रीला बंदी

मंत्रालयाच्या दारातच गुटखाबंदीचा पर्दाफाश


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा