Advertisement

सेंट जॉर्ज शाळेच्या आवारात सर्रास विकला जातोय गुटखा


सेंट जॉर्ज शाळेच्या आवारात सर्रास विकला जातोय गुटखा
SHARES

मुंबईत गुटखाबंदी केवळ कागदावरच असल्याचा पुरावा हवा असेल, तर जुहूच्या सेंट जाॅर्ज शाळा परिसराला नक्कीच भेट द्यावी. या शाळा परिसरात नियमबाह्य पद्धतीने दारू, गुटखा, तंबाखू आणि सिगारेटची सर्रास विक्री सुरू आहे.


नियम पायदळी तुडवले

या अनधिकृत विक्रीविरोधात शाळा प्रशासनाने अनेक वेळा उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली. तरीही या दुकानांवर कारवाई करण्यात आलेली नाही. शाळेच्या १०० मीटरपर्यंतच्या आवारात दारूच्या विक्रीला बंदी आहे. तरीही हा नियम सेंट जॉर्ज शाळेच्या परिसरात पायदळी तुडवला जात आहे.



पत्राला अजब उत्तर

शाळेच्या परिसरातून ही दुकाने हद्दपार करावीत, याकरीता शाळा प्रशासनाने अनेकवेळा उत्पादन शुल्क विभागाला पत्र लिहिली. त्यावर उत्पादन शुल्क विभागाकडून आलेल्या उत्तरामुळे शाळा प्रशासनाला धक्काच बसला. उत्पादन शुल्क विभागाच्या उत्तरानुसार , ‘धार्मिक आणि शैक्षणिक संस्थेच्याजवळ बेकायदा मद्य परवाने मंजूर केल्याची तक्रार कार्यालयाला प्राप्त झालेली आहे. तरी आपल्या संस्थेच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करण्यास एकूण किती गेट अधिकृतरित्या मंजूर आहेत, याची माहिती पाठवावी'. 



गेट किती

उत्पादन शुल्क विभागाकडून आलेल्या या अजब उत्तराने शाळा प्रशासन चक्रावले आहे. शाळा परिसरातील दारूच्या दुकानांवर बंदी आणण्याऐवजी उत्पादन शुल्क विभाग शाळेच्या गेटसंदर्भात विचारत असल्याने शाळा प्रशासन गोंधळात आहे.


शाळेच्या १०० मीटर परिसरात गुटखा, दारू विक्रीला बंदी आहे. मात्र सेंट जॉर्ज परिसरात सर्रास या उत्पादनाची विक्री केली जात आहे. वारंवार तक्रार करूनही यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उत्पादन शुल्क विभागाकडून या तक्रारीवर आलेेले उत्तर वाचून शाळेला असलेले गेट आणि दारूच्या दुकानांचा काय संबंध हे कळत नाही. लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी. अशी मागणी आम्ही केली आहे. या सगळ्याचा शाळेत येणाऱ्या मुलांवर वाईट परिणाम होत आहे.
- गॉडफ्रे पामेंटा, ट्रस्टी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा