Advertisement

MPSC पूर्व परीक्षा ५ एप्रिललाच

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार आहे.

MPSC पूर्व परीक्षा ५ एप्रिललाच
SHARES

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार आहे. ५ एप्रिल २०२० रोजी ही पूर्वपरीक्षा  नियोजित वेळेनुसार होणार असल्याचं एमपीएससीने म्हटले आहे. 

 कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून १६ ते ३१ मार्च या कालावधीत कोणतीही परीक्षा घेऊ नयेत अशा राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या कालावधीतील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र या कालावधीत राज्यसेवा आयोगाची कोणतीही परीक्षा नाही.  त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा ५ एप्रिललाच होणार आहे.

 राज्यसेवा आयोगाने १७ मार्चला जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं की, जारी केले आहे. राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा ३१ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलण्याची सूचना १५ मार्च २०२० च्या शासन पत्राद्वारे केली आहे. मात्र, आयोगाच्या पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार १६ मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत आयोगामार्फत कोणतीही परीक्षा घेण्याचे प्रस्तावित नाही.

 राज्यसेवा पूर्व परीक्षा पूर्व रविवार दि. ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचे नियोजित आहे. या परीक्षेच्या आयोजनासंदर्भातली पूर्वतयारी झाली असल्याने योग्य ती दक्षता घेऊन पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० घेण्यात येईल, असं आयोगाने म्हटलं आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा