Advertisement

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मुंबईत आक्रोश


एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मुंबईत आक्रोश
SHARES

राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध विभागातील रिक्त पदे भरली गेलेली नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी या परीक्षेतील भरती प्रक्रियेविरोधात मुंबईत मंगळवारी ‘आक्रोश मोर्चा’ काढणार आहेत. महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीने या मोर्चाचं आयोजन केलं आहे. 

 नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन केंद्रांसाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर सरकारकडून तरतूद करण्यात आली आहे. मात्र राज्यात परिस्थिती वेगळी असल्याने आता विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात राज्यातील सर्व विद्यार्थी संघटना एकत्र येणार आहेत.

याआधी एमपीएससी विद्यार्थ्यांनी याच प्रकारचा मोर्चा औरंगाबादमध्ये काढला होता. औरंगाबादमधील मोर्चात हजारोंच्या संख्येत विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर ८ फेब्रुवारीला पुण्यातही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. मुंबईच्या या मोर्चात जवळपास १००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत आपण येथून हलणार नसल्याची प्रतिक्रिया समितीचे बाळासाहेब सानप यांनी दिली.


विद्यार्थ्यांच्या मागण्या?

  • सरळ सेवेतील ३० टक्के कपाती धोरण तात्काळ रद्द करा
  • जिल्हा परिषद, जलसंपदा, समाजकल्याण, महिला आणि बालकल्याण इत्यादी सर्वच विभागातील जागा १०० टक्के भरा
  • शिक्षकांची रिक्त असलेली २४ हजार पदे केंद्रीय पद्धतीने झालेल्या TAIT द्वारे तात्काळ भरा
  • जिल्हा परिषद आणि मनपाची एकही शाळा बंद करू नये
  • सर्व परीक्षा शुल्क १०० ते २०० रुपयांपर्यंतच आकारण्यात यावं
  • सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमाह २ हजार रुपये निर्वाह भत्ता द्या
  • महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील रिक्त जागा SET-NET पास आणि PHD धारक प्राध्यापकांची तात्काळ भरती करा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा