कलिना - मुंबई विद्यापिठातील जे.पी. नाईक सभागृहात विद्यार्थ्यांना माहिती अधिकाराचे धडे देण्यात आले. या कार्यशाळेत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, तंत्रशिक्षणातील भ्रष्टाचार बाहेर काढणारे वैभव नरवडे आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष आठवले यांनी मार्गदर्शन केले. संजय वैराल यांच्या नेतृत्वाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रात माहिती अधिकार काय आहे किंवा त्या अधिकाराचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन यावेळी देण्यात आले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकेच निरसन देखील करण्यात आले.