Advertisement

लॉ च्या नव्या परिक्षांना विद्यार्थ्यांचा विरोध; ऑनलाईन याचिका दाखल

केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगानुसार मुंबई विद्यापीठानं श्रेयांक श्रेणी पध्दत सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी या पद्धतीत बदल करण्यात येत असल्याचं परीपत्रक मुंबई विद्यापीठानं जाहीर केलं होतं. या परिपत्रकानुसार आता परीक्षेत ६०/४० ही पध्दत वापरण्यात येणार असून लॉ शाखेमध्ये ही पध्दत सुरू करण्यात आली आहे.

लॉ च्या नव्या परिक्षांना विद्यार्थ्यांचा विरोध; ऑनलाईन याचिका दाखल
SHARES

मुंबई विद्यापीठानं यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लॉ अभ्यासक्रमाच्या परीक्षा पद्धतीत बदल करून ६०/४० हा नवा पॅटर्न सुरू केला आहे. या पॅटर्नला अनेक विद्यार्थी संघटना कडाडून विरोध दर्शवत असूनही या परीक्षा पद्धतीवर विद्यापीठ प्रशासन मात्र ठाम आहे. यामुळं स्टुंडट लॉ काऊन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. change.org या वेबसाईटवर ही ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली असून ८६० विद्यार्थ्यांच्या सह्या करून हा नवा पॅटर्न रद्द करण्याची मागणी केली आहे.


उत्तीर्णतेच्या नियमातही बदल

केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगानुसार मुंबई विद्यापीठानं श्रेयांक श्रेणी पध्दत सुरू केली आहे. या पद्धतीत गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्याच वेळा बदल करण्यात आला अाहे. काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा या पद्धतीत बदल करण्यात येत असल्याचं परीपत्रक मुंबई विद्यापीठानं जाहीर केलं होतं. या परिपत्रकानुसार आता परीक्षेत ६०/४० ही पध्दत वापरण्यात येणार असून लॉ शाखेमध्ये ही पध्दत सुरू करण्यात आली आहे. या नव्या पद्घतीनुसार लॉ शाखेत आता ६० गुणांच्या परीक्षेत १८ गुण मिळवणं बंधनकारक ठरणार असून ४० गुणांच्या परीक्षेत १२ गुणांची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लॉ शाखेच्या परीक्षेत उत्तीर्णतेच्या नियमातही बदल झाला आहे.  

विद्यापिठाचा प्रतिसाद नाही

विशेष म्हणजेच या निर्णयाविरोधात लॉ काऊन्सिलनं प्रकुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र देऊन हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंतीही केली होती. मात्र विद्यापीठानं अद्याप कोणतही पाऊल न उचलल्यानं आता त्यांनी ऑनलाईन याचिका सुरू केली आहे.



विद्यापीठ प्रशासनानं सुरू केलेल्या या नव्या परीक्षा पद्धतीनुसार, विद्यार्थी उत्तीर्ण होणं अधिकच सोपं होणार अाहे. मात्र, नव्या पॅटर्नमुळं लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळणार आहे. तसंच मुंबई विद्यापीठाविरोधात सुरू केलेल्या या ऑनलाइन याचिकेविरोधात आतापर्यंत ८६८ जणांनी सही केली आहे. लवकरात लवकर हा नियम रद्द करावा, अशी मागणीही आम्ही याचिकेत केली आहे.
- सचिन पवार , अध्यक्ष,  स्टुडंट लॉ काऊन्सिल



हेही वाचा-

अर्धवेळ ग्रंथपालाची आता पूर्णवेळ नियुक्ती; सरकारचा निर्णय

नेटची परीक्षा आता ऑनलाइन




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा