नेटची परीक्षा आता ऑनलाइन

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट ही परीक्षा आता ऑनलाइन घेतली जाणार अाहे.

SHARE

कॉलेजांमधील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट ही परीक्षा आता ऑनलाइन घेतली जाणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. तसंच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तर्फे घेतली जाणारी नेट परीक्षा आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेतली जाणार आहे.


अर्जाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत

नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही मनुष्यबळ विकास मंत्रालयाची स्वायत्त संस्था असून या संस्थेमार्फत सहाय्यक प्राध्यापक किंवा ज्युनिअर रिसर्च फेलोशिप या दोन्ही पदांसाठी नेट परीक्षा घेण्यात येते. सध्या या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून अर्ज करण्याची अंतीम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असणार आहे. येत्या ९ ते २३ डिसेंबर दरम्यान ही कम्प्युटर बेस्ड ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असल्याचं एनटीएनं स्पष्ट केल आहे.


फक्त दोन पेपर 

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) तर्फे नेट परीक्षेच्या स्वरूपात काही महिन्यांपूर्वी बदल करण्यात आला होता. त्यनुसार नेट परीक्षेत आता फक्त दोन पेपर घेण्यात येणार असून पहिला पेपर १०० गुणांचा आणि दुसरा पेपर २०० गुणांचा असणार आहे. त्याशिवाय आतापर्यंत ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येत होती. मात्र आता या परीक्षेच्या स्वरूपात आमूलाग्र बदल करण्यात आला असून पहिल्यांदाच ही परीक्षा पंधरा दिवसांत दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे.


२ सत्रात परीक्षा

दोन सत्रांमध्ये होणाऱ्या या परीक्षेत सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत १०० गुणांचा पहिला पेपर तर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत २०० गुणांचा दुसरा पेपर घेण्यात येईल. दुपारच्या सत्रात २ ते ३ पहिला पेपर व ३.३० ते ५.३० या वेळेत दुसरा पेपर घेतला जाईल. नेट परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गासाठी ८०० रुपये, ओबीसी प्रवर्गासाठी ४०० रुपये, एससी एसटी प्रवर्गासाठी २०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. या संदर्भातील अधिक माहितीसाठी 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.हेही वाचा -

शिक्षक दिन: शिक्षक-विद्यार्थी नात्याचा बदललेला परिघ

कॉलेज शिक्षकांची ११ सप्टेंबरला कामबंदची हाक
संबंधित विषय
ताज्या बातम्या