Advertisement

52 दिवसांनंतर विद्यार्थ्यांचे उपोषण मागे


52 दिवसांनंतर विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
SHARES

आझाद मैदान - गेले 52 दिवस आझाद मैदान येथे उपोषण करणाऱ्या एसआरएमआयच्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी उपोषण मागे घेतले. साताऱ्यातील मायनी गावातील एसआरएमआयच्या मेडिकल कॉलेजच्या द्वितीय वर्ष निकालाच्या घोळामुळे 100 विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानाबाबत सरकारने घेतलेल्या सकारात्मक धोरणामुळे हे उपोषण मागे घेतले गेले. या विद्यार्थ्यांनी सन 2014-15 च्या दरम्यान द्वितीय वर्षाची प्रवेश परीक्षा देऊन सुद्धा त्यांना नापास केले गेले. 

नापास विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देऊन सुद्धा संबंधित महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे निकाल रखडून ठेवले आणि निकाल रखडून ठेवल्याने संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश महाविद्यालयाने रद्द केले. सदर घटनेबाबत प्रवेश नियंत्रण समितीकडे दाद मागितली असता त्यांनी प्रती विद्यार्थी 20 लाख प्रमाणे100 विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने द्यावे असे सांगितले. पण सदर महाविद्यालयाने 10% रक्कम भरली आणि पुढे कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही वा निर्णय घेतला नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. संबंधित विद्यार्थ्यांची बाजू ऐकून सरकारने हस्तक्षेप करत महाविद्यालयाने लवकरात लवकर रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

पण सरकारही या संदर्भात काही करत नसल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांचे पैसे सरकारने परत करावे अशी याचिका कोर्टाने संमत केल्याने विद्यार्थ्यांना मानहानी मोबदला तर देऊ केला अाहे. पण डॉक्टरी वर्षाचे काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत अाहे. 

वैद्यकीय मंत्री आणि मेडीकल कौन्सिल अॉफ इंडिया यांच्याशी सल्ला मसलत करत पुढील निर्णय युनियन स्टुडंट करणार असल्याचे युनियन प्रमुख प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले. 52 व्या दिवशी हे आंदोलन थांबणार असून, पुढे मुलांच्या भवितव्याचा निकाल लागत नाही. तोपर्यंत साखळी आंदोलन पुढे चालू ठेवणार असल्याचे ही सांगण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा