Advertisement

'टीईटी' नकोच, शिक्षकांचा आक्रमक पवित्रा


'टीईटी' नकोच, शिक्षकांचा आक्रमक पवित्रा
SHARES

मुंबईतील शिक्षण सेवकांना सेवासातत्य देताना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट टाकल्याच्या निर्णयावर काही शिक्षकांनी आक्षेप नोंदवला आहे. सोबतच तातडीने ही अट मागे घेण्याची मागणी केली आहे.


'आमच्यासाठी टीईटी लागू होत नाही'

शिक्षण निरीक्षक उत्तर विभागात सप्टेंबर २०१३ मध्ये अनेक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांवर भरती करण्यात आली होती. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये २०१३ पूर्वी कार्यरत असलेल्या शिक्षकांना शिक्षण सेवकांच्या मान्यता तत्कालीन शिक्षण निरीक्षकांनी दिल्या आहेत. त्या मान्यता पत्रात या शिक्षकांच्या मूळ नियुक्त्या २०१३ पूर्वीच्या असल्याचंही दाखवलं असल्यानं या शिक्षकांना टीईटी (टीचर एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता चाचणी लागू होत नाही, असं स्पष्टीकरण शिक्षक देत आहेत.


शिक्षण निरीक्षकांची कृती नियमबाह्य

शिक्षण निरीक्षकांनी शिक्षण सेवक पदाची मान्यता देताना टीईटीबाबत कोणतीही अट टाकली नव्हती. त्यामुळे आता सेवासातत्य देताना टीईटी उत्तीर्ण करण्याबाबतची आणि टीईटी उत्तीर्ण न केल्यास सेवासमाप्त करण्याची शिक्षण निरीक्षकांची कृती नियमबाह्य असल्याचंही शिक्षकांचं म्हणणं आहे.


आंदोलनाचा इशारा

शिक्षण सेवकांना ३ वर्षे पूर्ण झाल्यावर समाधानकारक सेवा केल्याचं प्रमाणपत्र शाळेकडून दिले की तो शिक्षण सेवक नियमित वेतनश्रेणीस पात्र होतो. याबाबत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ९ एप्रिल २००३ रोजी शासन निर्णयही निर्गमित केला असून त्यात सेवासातत्य देण्यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे. तरीसुद्धा शिक्षण निरीक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होण्याची नियमबाह्य अट टाकली असून तातडीने अट मागे न घेतल्यास या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक परिषदेनं दिला आहे.



हेही वाचा - 

शिक्षक व्हायचंय? आता सीईटीच्या आधी द्या टीईटीची परीक्षा!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा