शिक्षकांचा 'फायर शॉटस्'

 BMC office building
शिक्षकांचा 'फायर शॉटस्'

परळ - शिक्षणमंत्र्यांनाच 'सरप्लस'च्या यादीत टाका, अशा घोषणा देत गांधी जयंतीच्या निमित्ताने शिक्षक भारतीने राज्यव्यापी आंदोलन पुकारले. परळच्या कामगार मैदानात हुतात्मा बाबू गेनूच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा देत बिनधुराचे फायर शॉटस् हवेत भिरकावले. 'गांधी जयंतीला आणि शिक्षकांच्या पेशाला साजेसे असे हे अहिंसक आंदोलन आहे', असे शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी सांगितले. यावेळी आमदार कपिल पाटील यांच्या समवेत, प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, कार्याध्यक्ष प्रकाश दाणे, जयवंत पाटील, प्रमुख कार्यवाह सुभाष मोरे, मुंबईचे अध्यक्ष अंकुश महाडीक, कार्यवाह राजू बंडगर, विनाअनुदानविरोधी कृती समितीचे राहुल पाटील यांच्यासह राज्यभरातील संघटनांचे ३००हून अधिक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. 'महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याआधी शिक्षणमंत्र्यांना सरप्लस करण्याची वेळ आली आहे', अशी टीका आमदार कपिल पाटील यांनी केली.

Loading Comments