Advertisement

स्वाती महाडिक यांची प्रेरणादायी कहानी आता १० वीच्या पुस्तकात

शहिद कर्नल संतोष महाडिक यांच्या ३८ वर्षांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीत ११ महिन्यांचं खडतर प्रशिक्षण घेतलं आणि त्या अधिकारी पदावर लष्करात दाखल झाल्या. सध्या त्या पुण्यातील लष्कराच्या आॅर्डिनन्स कोअरमध्ये कार्यरत आहेत.

स्वाती महाडिक यांची प्रेरणादायी कहानी आता १० वीच्या पुस्तकात
SHARES

राज्य शिक्षण मंडळाने १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तकं उपलब्ध केली आहेत. चालू घडामोडींवर आधारीत धड्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असं म्हटलं जात आहे. त्यातच शहिद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांच्या शौर्यगाथेवर आधारीत धड्याचाही समावेश असणार आहे.


पतीचं स्वप्न साकार

तीन वर्षांपूर्वी कर्नल संतोष महाडिक जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहिद झाले होते. देशसेवेचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या ३८ वर्षांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीत ११ महिन्यांचं खडतर प्रशिक्षण घेतलं आणि त्या अधिकारी पदावर लष्करात दाखल झाल्या. सध्या त्या पुण्यातील लष्कराच्या आॅर्डिनन्स कोअरमध्ये कार्यरत आहेत.


प्रेरणादायी कहानी

पती शहिद झाल्यानंतर मुलांची जबाबदारी अंगावर पडूनही स्वाती महाडिक डगमगल्या नाहीत किंवा रडतही बसल्या नाहीत. त्यांनी आपल्या पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लष्करात दाखल होण्याचं ठरवलं. त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन यशही मिळवलं. त्यांची ही कहानी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.



हेही वाचा-

दहावीच्या विद्यार्थ्यांची घोकंपट्टी बंद होणार!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा