Advertisement

दहावीच्या विद्यार्थ्यांची घोकंपट्टी बंद होणार!

यावर्षी पासून दहावीची सर्व पुस्तकं नवीन अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहेत. विशेष म्हणजे दहावीच्या गणिताच्या पुस्तकात जीएसटी, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, प्राप्तिकर यांसारख्या दैनंदिन जीवनातल्या व्यवहारांचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानात भर पडणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांची घोकंपट्टी बंद होणार!
SHARES

दहावी म्हटलं की आपल्यापुढं लगेच घोकंपट्टी करून परीक्षेला जाणारे विद्यार्थी आठवतात. परंतु येत्या काही दिवसांत आपल्याला हे चित्र नक्की पालटलेलं बघायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. याचं मुख्य कारण म्हणजे दहावीचा बदललेला अभ्यासक्रम.

यावर्षी पासून दहावीची सर्व पुस्तकं नवीन अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहेत. विशेष म्हणजे दहावीच्या गणिताच्या पुस्तकात जीएसटी, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, प्राप्तिकर यांसारख्या दैनंदिन जीवनातल्या व्यवहारांचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानात भर पडणार आहे.


ज्ञानरचनावादाला विशेष महत्त्व

संपूर्ण देशभरात शिक्षण हक्क कायदा लागू केल्यापासून शिक्षणात ज्ञानरचनावादाला विशेष महत्त्व दिलं जात आहे. त्यानुसारच दहावीचा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. बुधवारी दादरच्या शिवाजी मंदिर सभागृहात दहावीच्या नवीन पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशनात नवीन अभ्यासक्रमातील काही बाबी चर्चासत्रात मांडण्यात आल्या.


चालू घडामोडींचाही समावेश

या नवीन अभ्यासक्रमात शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वअध्ययन, शोधवृत्ती, निरीक्षण, निर्णयक्षमता, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्याशिवाय त्यात चालू घडामोडींचाही समावेश करण्यात आला आहे.


धड्यासोबत क्यू आर कोड

प्रत्येक विषयातील धड्यासोबत क्यूआर कोडही देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या धड्यासंबंधित अधिक माहिती प्राप्त करता येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात रुची निर्माण होण्यासाठी विविध चित्र, उदाहरणेही देण्यात आली आहेत.

पुस्तकाच्या सुरुवातीलाही क्यूआर कोड देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी तो स्कॅन केल्यानंतर त्या पुस्तकाच्या संदर्भातील बाह्य माहिती मिळू शकणार आहे. दैनंदिन जीवनातील अनेक बाबींचा गणितात समावेश व्हावा या उद्देशाने गणितात दैनंदिन व्यवहारातील संकल्पना घेण्यात आल्या आहेत. तसंच त्यात अर्थशास्त्राचाही समावेश करण्यात आला आहे.



हेही वाचा-

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध

आरटीई प्रवेशासाठी १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा