Advertisement

मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयाची संख्या वाढणार


मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयाची संख्या वाढणार
SHARES

मुंबई शहरात महिला महाविद्यालय, रात्र महाविद्यालय, दक्षिण मुंबईत विधी महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात त्या-त्या जिल्ह्यात रोजगाराभिमुख शिक्षण देणारी महाविद्यालय सुरू करावीत, अशा तब्बल २१३५ हरकती-सूचनांचा समावेश असलेल्या पाच वर्षांच्या बृहत् अाराखड्याला सिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या आणखी वाढणार आहे. सध्या ही संख्या ७५० इतकी होणार आहे.


महाविद्यालय सुरू करण्याची मागणी

मुंबई विद्यापीठाच्या पंचवार्षिक शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२३-२४ अशा पाच वर्षाच्या बृहत् आराखड्यासाठी शिक्षक-विद्यार्थ्यापासून स्थानिक लोकप्रतिनिधींपर्यंत प्रत्येकाकडून सूचना हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार आलेल्या सूचना-हरकतींमध्ये रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाची महाविद्यालये सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये विशेषतः कल्याणमधील ग्रामीण भागामध्ये व भिवंडी तालुक्यात विधी, आर्किटेक्चर व फार्मसी महाविद्यालय सुरू करावे, असे या बृहत् आराखड्यामध्ये नमूद करण्यात आलं अाहे.


सूचनांचा समावेश

हा बृहत् आराखडा नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी मांडला. यावेळी सदस्य आणि समाजातील घटकांनी केलेल्या योग्य असणाऱ्या सूचनांचा समावेश बृहत् आराखडय़ात करण्यात येईल, असं मत कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी मांडले.


हेही वाचा -

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : इस्माईल युसुफच्या विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

शाळेच्या इमारतीचं होणार फायर ऑडिट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा