SHARE

शहरातील शाळांमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टीने शाळा इमारतींचं फायर ऑडिट करण्यात येणार आहे. पालिका शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश दिले आहेत. तसंच विद्यार्थ्यांचे मॉक ड्रिल करण्याबाबतही शाळांना सांगण्यात आले आहेत.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये फायर ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याचे प्रशिक्षणही २३ एप्रिल आणि २८ जून रोजी शाळांना देण्यात आलं होतं. यानुसार शाळांनी काय कार्यवाही केली, हे तपासण्यासाठी शाळांनी इमारतीचं फायर ऑडिट करून विद्यार्थ्यांचे मॉक ड्रिलही करून घ्यावेत आणि याबाबत संपूर्ण अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आदेश पालिका शिक्षण विभागाने दिले आहेत.


याला पालिका जबाबदार नसेल

या आदेशाचं पालन न करणाऱ्या शाळेत कोणताही अनुचित प्रकार घडला, तर त्यासाठी पालिका जबाबदार राहणार नाही, असंही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.


फायर ऑडिट करायचं असल्यास...

फायर ऑडिट करायचं असल्यास ते पालिकेनं ठरवून दिलेल्या कंपन्यांकडून करून घ्यावे लागते. हे ऑडिट करण्यासाठी हजारो रुपये आकारले जातात. पालिका शाळांचं फायर ऑडिट जर मुंबई अग्निशमन दलामार्फत केलं जाणार असेल तर खासगी अनुदानित शाळांचे फायर ऑडिटही मुंबई फायर ब्रिगेडने करावे, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रशांत रेडिज यांनी केली आहे.


हेही वाचा - 

माटुंग्यातील पादचारी पूल धोकादायक नाही!

अग्निशमन दलाची ‘एफबीएसएस’ प्रणाली १२ वर्षांपासून धुळखात पडून

संबंधित विषय
ताज्या बातम्या