Advertisement

माटुंग्यातील पादचारी पूल धोकादायक नाही!

माटुंग्यातील पादचारी पुलाच्या सुरूवातीच्या एका खांबाचं सिमेंट निघालं होतं. परंतु त्यानंतर हा पूल खालच्या दिशेला झुकल्यासारखं पादचाऱ्यांचं म्हणणं असल्यानं या पुलाची पाहणी करून जी-उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा पूल पादचाऱ्यांसाठी त्वरीत बंद केला.

माटुंग्यातील पादचारी पूल धोकादायक नाही!
SHARES

पश्चिम माटुंगा रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलाला तडे गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यावर हा पूल सर्वांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र या पुलाचं स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतर हा पूल शुक्रवारपासून पादचाऱ्यांसाठी पुन्हा खुला करण्यात आला. या पुलाला तडे गेले नसून ते पुलाचा जोड असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.



कुठला पूल?

अंधेरीतील गोखले पूल दुघर्टनेनंतर पश्चिम माटुंगा रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या पादचारी पुलालाही तडे गेल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर हा पूल मागील शुक्रवारपासून बंद करण्यात आला. माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकातून पश्चिम दिशेला जाणारा हा पादचारी पूल असून तो संत विश्वेश्वरय्या उड्डाणपुलाला जोडतो.


सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

या पादचारी पुलाच्या सुरूवातीच्या एका खांबाचं सिमेंट निघालं होतं. परंतु त्यानंतर हा पूल खालच्या दिशेला झुकल्यासारखं पादचाऱ्यांचं म्हणणं असल्यानं या पुलाची पाहणी करून जी-उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा पूल पादचाऱ्यांसाठी त्वरीत बंद केला.



केलं स्ट्रक्चरल आॅडिट

हा पादचारी पूल बंद करण्यात आल्यानंतर जी-उत्तर विभागाच्यावतीनं प्रमुख अभियंता पूल विभागाला याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार महापालिकच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून याचा अहवाल जी-उत्तर विभागाला सादर केला.


पुलाला नाही धोका

या अहवालात हा पूल धोकादायक नाही. या पुलाला तडे गेले नसून ते एक्स्पाटशन जॉईंट असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर शुक्रवारी दुपारी हे पूल रेल्वे प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आल्याची माहिती जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांनी दिली.



हेही वाचा-

मुंबईतील 'हे' धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद

दक्षिण भारतातील वैलंकनी उत्सवासाठी परेची विशेष ट्रेन

मुंबई-नागपूर अंतर होणार ६ तासांचं, हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा