Advertisement

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : इस्माईल युसुफच्या विद्यार्थ्यांना मिळाला न्याय


मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : इस्माईल युसुफच्या विद्यार्थ्यांना मिळाला न्याय
SHARES

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर जोगेश्वरीतील इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या ५० टक्के विद्यार्थ्यांना नापास केल्याचं प्रकरण उघड झालं होतं. त्यानंतर त्या कॉलेजच्या आवारात काही विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. त्यांच्या या आंदोलनाला यश आलं असून राज्य परिक्षा मंडळानं नापास झालेल्या १५७ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतल्यानंतर त्यातील ६२ विद्यार्थी पास झाले आहेत. याबाबत मुंबई लाइव्हनं बातमी प्रदर्शित केली होती.


काय आहे प्रकरण

जोगेश्वरीतील इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये बारावीत विज्ञान शाखेत ३११ विद्यार्थ्यांपैकी १५४ विद्यार्थी पास झालं होते. तर १५७ विद्यार्थी नापास झाले होते.  नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे गुण न दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाकडे धाव घेत, त्यांना याबाबत जाब विचारला होता. मात्र सर्व विद्यार्थ्यांची गुणपत्रिका आम्ही बोर्डाकडं जमा केली अस सांगत कॉलेजने या प्रकारची दखल घेतली नाही.

त्यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी ४ जूनला कॉलेजसमोर आंदोलन केलं होतं.  या प्रकरणाचा छडा लावण्याकरिता अभाविपचे कार्यकर्ते व नापास झालेले विद्यार्थी यांनी मंत्रालयात धडक घेतली होती. त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी केलेल्या चौकशीनंतर ही चूक कॉलेज प्रशासनाकडून झाली असून त्याला सुधारण्यासाठी येत्या काही दिवसात या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येईल, असा निर्णय बोर्डाद्वारे घेण्यात आला. विशेष म्हणजे बोर्डाच्या इतिहासात प्रथमच प्रॅक्टिकल फेरपरीक्षा होत अाहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे हे विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपण उभे राहिले. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही याची त्यांनी दखल घेतली. त्यामुळे १५७ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात अाली. या विद्यार्थ्यांपैकी ६२ विद्यार्थी पास झाले आहेत.
 - अनिकेत ओव्हाळ, प्रदेशमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदहेही वाचा -

शाळेच्या इमारतीचं होणार फायर ऑडिट

एल्फिन्स्टन महाविद्यालयाचा गलथान कारभार : १२७ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित 

संबंधित विषय
Advertisement