Advertisement

इंटिग्रेटेड संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नका , शालेय शिक्षण विभागाचं आवाहन


इंटिग्रेटेड संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नका , शालेय शिक्षण विभागाचं आवाहन
SHARES

दरवर्षी जेईई, नीट परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी इंटिग्रेटेड संस्थांमध्ये प्रवेश घेतात. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. या कॉलेजांमध्ये हजेरी नाही लावली, तरी त्यांच्या कोचिंग क्लासमध्ये लावलेली हजेरी कॉलेजची हजेरी म्हणून ग्राह्य धरली जाते. त्यामुळे कोचिंग क्लासेस आणि ज्युनिअर कॉलेज एकत्रित असलेल्या इंटिग्रेटेड संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नका, असं आवाहन शालेय शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांना केलं आहे.


बायोमेट्रीक हजेरी सक्तीची

या कॉलेजांमध्ये हजेरी न लावल्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होते. फसवणूक झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेला बसता येत नाही. त्यामुळे या कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांनी नियमितपणे हजेरी लावावी यासाठी बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार आहे. त्याशिवाय सीसीटिव्ही लावणं सक्तीच करण्यात येणार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. तसेच कॉलेजांना ही सर्व व्यवस्था करण्यासाठी अवधी दिला जाणार असून त्यानंतर कॉलेजांमध्ये जाऊन याची तपासणीही केली जाणार असल्याचं ते म्हणाले.


प्रवेश पोर्टलवरही अावाहन

इंटीग्रेटेड कॉलेजामध्ये प्रवेश घेऊ नका, असं आवाहन शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पोर्टलवरही केलं आहे. त्याचप्रमाणे या कॉलेजांमध्ये प्रवेश घेतल्यावर कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्याला शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असंही या पोर्टलवर नमूद करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

सुट्टी संपली...मुंबईतील शाळा सुरू

मुंबई विद्यापीठासह ७७८ महाविद्यालयांचं ऑडिट होणार!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा