Advertisement

यंदा विद्यार्थ्यांना ऑनलाईन समजणार निकाल


यंदा विद्यार्थ्यांना ऑनलाईन समजणार निकाल
SHARES

राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय बंद असल्यानं शैक्षणिक वर्ष २०२९-२० मधील इयत्ता १ली ते इयत्ता ८वी आणि इयत्ता ९वी व इयत्ता ११वीतील विद्यार्थ्यांचा निकाल एसएमएस, दूरध्वनी व इतर ऑनलाइन पद्धतीनं तात्काळ कळविण्यात यावा. जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये संभ्रम राहणार नाही, अशा सूचना पत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक यांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना उपलब्ध साहित्याच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्यास करता येणं शक्य होईल त्या दृष्टीकोनातून हा निकाल तात्काळ ऑनलाइन कळवून पुढील इयत्तेत त्यांना बढती देण्यात यावी, असं सांगण्यात आलं आहे.

या परिपत्रकात स्थानिक लॉकडाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना निकालपत्र देण्याची आवश्यक कार्यवाही शाळा कनिष्ठ महाविद्यालयानं करायची आहे. मात्र, यामुळं शिक्षकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वर्षभरातील घटक चाचणी, सहामाही निकालाची कागदपत्रं, विद्यार्थ्यांची माहिती सर्व शाळांमध्ये असताना घरी बसून शिक्षकांनी निकालाची कार्यवाही कशी करायची? शिवाय संचारबंदीच्या काळात शाळांत पोहचायचे तरी कसे असे अनेक प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित होत आहेत.

अनेक शिक्षकांचे १० वी बोर्डाचे पेपर देखील शाळेतच आहेत ते तपासून नियमकांकडे कसे पाठवावे याबाबतचा निर्णय अजूनही राज्य मंडळाने घेतलेला नसल्याने १०वीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा