Advertisement

अतिरिक्त गुणांपासून हजारो विद्यार्थी वंचित; उच्च शिक्षण, नोकरीची संधी हुकली

'नेट', 'सेट' अादी उच्च शिक्षणासाठी आवश्यक पूर्व परीक्षांसाठी पदवीमध्ये विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. मात्र अनेकदा विद्यार्थ्यांना ५४.५० किंवा त्या आसपास गुण मिळतात. अशावेळी विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची संधी अल्पश: गुणांमुळं हुकते.

अतिरिक्त गुणांपासून हजारो विद्यार्थी वंचित;  उच्च शिक्षण, नोकरीची संधी हुकली
SHARES

उच्च शिक्षणासाठी अनेकदा 'हायर सेकंड क्लास' असणं आवश्यक आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना एक टक्का किंवा जास्तीत जास्त १० गुणांपर्यंत अतिरिक्त गुण देता येऊ शकतात, असं परिपत्रक विद्यापीठ अनुदान आयोगानं जाहीर केलं आहे. मात्र अनेक वर्षांपासून मुंबई विद्यापीठातील हजारो विद्यार्थी यापासून वंचित असून परिणामी कित्येक विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण व चांगल्या नोकरीची संधी हुकल्याचं निदर्शनास आलं आहे.


अंमलबजावणी नाही

'नेट', 'सेट' अादी उच्च शिक्षणासाठी आवश्यक पूर्व परीक्षांसाठी पदवीमध्ये विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. मात्र अनेकदा विद्यार्थ्यांना ५४.५० किंवा त्या आसपास गुण मिळतात. अशावेळी विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची संधी अल्पश: गुणांमुळं हुकते. अशावेळी विद्यार्थ्यांना संधी द्यावी या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने १९९० व २०११ मध्ये परिपत्रक काढून 'हायर सेकंड क्लास' किंवा प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थ्याला उच्च श्रेणी मिळण्यासाठी १ टक्का अतिरिक्त गुण द्यावा असे स्पष्टं केल होतं. मात्र याबाबत मुंबई विद्यापीठात अंमलबजावणी होताना दिसत नाही.


युजीसीचं पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी ही बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली  आहे. मुंबई विद्यापीठाकडून केवळ श्रेणी आधारित अभ्यासक्रमांना हे अतिरिक्त गुण दिले जातात. मात्र पारंपरिक १०० गुण असलेल्या अभ्यासक्रमांना ते दिले जात नाहीत. विशेष म्हणजे यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाचं (युजीसी) लेखी पत्र असतानाही मुंबई विद्यापीठात अंमलबजावणी होताना दिसत नाही. 


विद्यापीठाच्या या गोंधळामुळे २५ वर्षांत हजारो विद्यार्थी या लाभापासून वंचित राहिले आहेत. एकाच विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना हा दुजाभाव का? विद्यापीठाने सर्व कॉलेज आणि वेबसाइटवर याबाबतची माहिती ठळकपणे प्रसिद्ध करावी. ज्यांना हे गुण मिळाले नाहीत, त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने ते देण्यात यावेत. तसेच इतके वर्षे हे गुण का दिले गेले नाहीत याचं स्पष्टीकरणही विद्यापीठाने द्यावं.

- संतोष गांगुर्डे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाहेही वाचा - 

बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

गैरप्रकारांमुळे मूल्यमापन चाचणी शाळास्तरावर होणार
संबंधित विषय