Advertisement

पत्रकारिता विभागातील तीन अभ्यासक्रम बंद?

मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातर्फे पाच अभ्यासक्रम चालवले जातात. यापैकी मास्टर ऑफ आर्ट्स (इलेक्ट्रॉनिक मीडिया), मास्टर ऑफ आर्ट्स (टेलिव्हिजन स्टडिज) आणि मास्टर ऑफ आर्ट्स (फिल्म स्टडिज) हे अभ्यासक्रम एक वर्षासाठी बंद करण्याचा निर्णय विभाग प्रमुखांनी घेतला आहे. याबाबत नुकतंच विभागानं कुलगुरूंना पत्र लिहून याची कल्पना दिली आहे.

पत्रकारिता विभागातील तीन अभ्यासक्रम बंद?
SHARES

मुंबई विद्यापीठाचा संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग स्थापनेपासूनच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडत आहे. आता या विभागातील तीन अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यानं हे अभ्यासक्रम बंद करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


कुलगुरुंना लिहलं पत्र

मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातर्फे पाच अभ्यासक्रम चालवले जातात. यापैकी मास्टर ऑफ आर्ट्स (इलेक्ट्रॉनिक मीडिया), मास्टर ऑफ आर्ट्स (टेलिव्हिजन स्टडिज) आणि मास्टर ऑफ आर्ट्स (फिल्म स्टडिज) हे अभ्यासक्रम एक वर्षासाठी बंद करण्याचा निर्णय विभाग प्रमुखांनी घेतला आहे. याबाबत नुकतंच विभागानं कुलगुरूंना पत्र लिहून याची कल्पना दिली आहे.


६० लाखांचं नुकसान

हे सर्व अभ्यासक्रम चालवणारे मुंबई विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. या तिन्ही अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येकी २० याप्रमाणे ६० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. प्रत्येकाचे सुमारे एक लाख रुपये शुल्क विद्यापीठाचं साधारण ६० लाख रुपयांचं नुकसान होणार आहे.

मुंबई विभागात मनुष्यबळ कमी असून फक्त तीन प्राध्यापक या विभागात काम करतात. त्यामुळे इतक्या कमी मनुष्यबळात हे अभ्यासक्रम चालवणे शक्य होत नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.


विद्यार्थी नाराज 

एककीडे या अभ्यासक्रमांना वाढती मागणी असताना फक्त विद्यार्थी क्षमता नसल्यानं अनेकांना प्रवेश न मिळाल्यानं विद्यार्थी नाराज आहेत. याच नाराजीचा फटका विद्यापीठाला बसत आहे. तसंच या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विभागाला काही प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करून भांडवल उपलब्ध करायचं असल्यानं इतर अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय विभागाकडून घेण्यात आला आहे.


तर आंदोलन तीव्र


विभागानं हे अभ्यासक्रम तडकाफडकी बंद केल्यानं विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे युवासेनंन याविरोधात विद्यापीठाकडे तक्रार दाखल केली असून लवकरच आम्ही कुलगुरुंकडेही निवदेन करणार आहोत. एकीकडे मुंबई विद्यापीठानं बृहत् आराखड्याच्या माध्यमातून कौशल्याभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले असताना, दुसरीकडे पत्रकारिता विभागानं महत्त्वाचे तीन अभ्यासक्रम बंद करणं ही बाब संतापजनक आहे. येत्या काही दिवसात हे अभ्यासक्रम पुन्हा सुरू केले नाही, तर युवासेना तीव्र आंदोलन करेल. 

- साईनाथ दुर्गे, कार्यकारणी सदस्य, युवासेना 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा