तरूणांना मोडी लिपीचे प्रशिक्षण

 Chinchpokali
तरूणांना मोडी लिपीचे प्रशिक्षण

चिंचपोकळी - रविवारी मोगल हाऊस येथे विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे मोडी लिपी प्रशिक्षणार्थी स्नेहसंमेलन घेण्यात आले. मोडी लिपी तज्ज्ञ आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश जोशी यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. किशोर टापरे हे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते.

मोडी लिपी ही भारतातील प्राचीन लिपींपैकी एक आहे. महाराष्ट्रात आधी शाळेत मराठी, हिंदी, इंग्लिशसोबत मोडी लिपी देखील शिकवली जात होती. मात्र आज परिस्थिती अशी आहे की आजच्या तरुण पिढीला मोडी लिपी म्हणजे नेमकं काय असतं? हे महितच नाही. याचाच प्रचार आणि प्रशिक्षण देण्यासाठी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ हे पुढे सरसावले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात तरुणांनी उपस्थिती लावली होती.

Loading Comments