Advertisement

व्हीजेटीआयच्या फी वाढीला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध

व्हीजेटीआय कॉलेजमध्ये एम. टेक या अभ्यासक्रमाचं शुल्क २०१६ मध्ये २३ हजार ६६५ रुपये इतकं होतं. परंतु आता मात्र ते अचानक वाढवून ५८ हजार ७३४ इतकं करण्यात आलं आहे. एखाद्या अनुदानित शिक्षणसंस्थेनं अशाप्रकारे शुल्कवाढ करणं चुकीचं आहे, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे.

व्हीजेटीआयच्या फी वाढीला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध
SHARES

माटुंगा येथील वीर जिजामाता टेक्नोलॉजी इंस्टिट्यूट (व्हीजेटीआय) या कॉलेजमधील एम. टेक शिक्षणाच्या फी शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. या फी वाढीला कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला असून त्याबाबत विद्यार्थ्यांनी युवा सेनेच्या माध्यमातून तंत्रशिक्षण संचालकांना पत्रही लिहिलं आहे.

विद्यार्थ्यांचा विरोध

व्हीजेटीआय कॉलेजमध्ये एम. टेक या अभ्यासक्रमाचं शुल्क २०१६ मध्ये २३ हजार ६६५ रुपये इतकं होतं. परंतु आता मात्र ते अचानक वाढवून ५८ हजार ७३४ इतकं करण्यात आलं आहे. एखाद्या अनुदानित शिक्षणसंस्थेनं अशाप्रकारे शुल्कवाढ करणं चुकीचं आहे, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे.

संचालकांना पाठवलं पत्र

याआधी फीच्या शुल्कात ६ हजार रुपये इतका विकास निधी घेण्यात येत होता. मात्र आता तो वाढवून ३२ हजार ५०० रुपये इतका करण्यात आला आहे. यामुळे अनुदानित संस्था इतका विकास निधी कसा वसूल करू शकते, असा प्रश्न उपस्थित करत विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी संचालकांना पत्र लिहिलं आहे.

युवासेनेची मागणी

दरम्यान, कॉलेजच्या विद्यमान संचालकांनी माझ्या आधीच्या संचालकांनीच ही शुल्कवाढ केल्याचं सांगत विद्यार्थ्यांना घरी परत पाठवलं. दरम्यान विद्यापीठ नियमांनुसार स्वायत्त महाविद्यालयांना वर्षाला १० टक्क्यांपेक्षा जास्त शुल्कवाढ करता येत नाही, असं असतानाही ही शुल्कवाढ कशी करण्यात आली? याची माहिती लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी युवासेनेद्वारे करण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा