Advertisement

१० वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेणार?

मुंबईसह राज्यभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं १०वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला.

१० वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेणार?
SHARES

मुंबईसह राज्यभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं १०वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मात्र या निर्णयानंतर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. शिक्षण व्यवस्थेची चेष्टा करता का? विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकार गंभीर नाही का? अशाच पद्धतीनं शिक्षण सुरू राहिले तर ईश्वरानेच या राज्याला वाचवावं, असे खडे बोल सुनावत १०वी परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच रद्द का करू नये? असा सवाल करीत उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं.

राज्य सरकारनं १०वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर पुणेस्थित प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी घेतला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. न्या. एस.जे. काथावाला व न्या. एस.पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. मूल्यमापन करण्यासाठी सूत्र आखले नाही. याबाबत २ आठवड्यांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्य सरकारी वकील पी. ए. काकडे यांनी न्यायालयाला दिली.

तुम्ही शिक्षण व्यवस्थेची चेष्टा चालवली आहे. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा विचार करीत आहात? दहावीचे वर्ष हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे परीक्षाही महत्त्वाची आहे. महामारीच्या नावाखाली सरकार विद्यार्थ्यांचे करिअर बरबाद करीत आहे. हे स्वीकारार्ह नाही. तुम्ही ही शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करीत आहात, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला.

मुंबईत आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत, असे तुम्ही म्हणता. मग दहावीच्या परीक्षा का रद्द करीत आहात? बारावीच्या परीक्षा का रद्द करीत नाही? हा भेदभाव कशाच्या आधारावर करण्यात आला? धोरण आखणाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे, असे वाटते. आपल्या देशाचे, राज्याचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे अशा पद्धतीने प्रमोट करू शकत नाही, अशी चिंताही न्यायालयाने व्यक्त केली.

एरवी ४० टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला अंतर्भूत मूल्यांकनात ९० ते ९२ टक्के मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याचा हा योग्य मार्ग नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. कोणताही विचार न करता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन शांत बसलात. मात्र, यातून कोणताही मार्ग काढला नाहीत, अशा शब्दांत राज्य सरकारला सुनावत न्यायालयाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच या याचिकेवरील पुढील सुनावणी एक आठवड्याने ठेवली. 



हेही वाचा -

पुन्हा एकदा आयपीएल सुरु होणार?

मुंबईच्या 'या' भागात कोरोनाचे नियम धाब्यावर


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा